रावेर ;– संत भीमा भोई जयंतीनिमित्त विरभगतसिंग व्यायाम शाळा, रावेर तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सध्या देशात कोरोना सारख्या महामारी मुळे राज्यात रक्तसाठा कमी प्रमाणात आहे. अश्या परिस्थिती भोईराज ढोलताशा पथक यांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. केशवस्मृती प्रतिष्ठिन संचालित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांच्या सहकार्याने आज एकूण 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले.व सर्व रक्तदात्याना मास्क, सॅनिटायसर,आर्सेनिक अल्बम 30 CH आणि प्रमाणात देऊन प्रोत्साहन दिले. यावेळी संतभिमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरची सुरुवात केली. यावेळी प्रकाश मुजुमदार दिलीप अग्रवाल, अँड. राहुल मुजुमदार, अँड.सुरज चौधरी, सुधीर अग्रवाल, यशवंत दलाल, गोपाळ भोई, संजू भोई, डॉ.रुची अग्रवाल, डॉ.चंद्रदीप पाटील, संतोष भोई, योगेश भोई, अभिजित लोणारी, भूषण भोई, गणेश भोई, प्रेम भोई, निलेश भोई, प्रमोद भोई, सागर भोई आणि सर्व व्यायाम शाळेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.