यावल ;- अभयारण्यात वनकर्मचार्यांवर नुकताच दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला यात भीषण गोळीबाराच्या घटना देखील घडून आली सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी चकमक घडवून आणणारे शिकारी हे हल्ला केल्यानंतर मध्यप्रदेशांत पळून गेले .शिकार तसेच अतिक्रमण हा त्यांचा उद्देश दिसून येत होता वनविभाग जरी जबाबदारीने स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य करीत असले तरी अतिक्रमण धारकांची संख्या, शिकऱ्यांजवळ असलेले प्राणघातक आधुनिक शस्रे यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेत या भागातील स्थानिक गावकरी, आदिवासी, वनविभाग यांच्यात समन्वय साधणे गरजेचे आहे या उद्देशाने वन्यजीव संरक्षण संस्थेने मुख्यवनसंरक्षक श्री अंजनकर याना पत्र देऊन सदर वनक्षेत्रात वनविभागा सोबत गस्त घालणे, गावकऱ्यांसोबत संवाद साधणे ,जनजागृती करणे या सारखे कार्य करण्या साठी संस्थेस परवानगी द्यावी म्हणून पत्रव्यवहार केला होता वनविभागा कडून परवानगी प्राप्त झाल्या नंतर संस्थेची 13 सदस्यीय टीम 2 दिवस यावल अभयारण्यात गस्तीसाठी गेली होती़.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर वनकर्मचारी , गावकऱ्याना फेसमास्क , सॅनिटायजर तसेच काही जीवनावश्यक साहित्य देखील देण्यात आले गस्ती दरम्यान कुठेही अनुचित प्रकार दिसून आला नाही. कोरोना चा फायदा घेत शेतजमिनी तयार करण्या साठी अनेक ठिकाणी आगी लावण्याचे प्रकार दिसून आले आणि वनकर्मचार्यांनी वेळीच त्या विझवल्याचे देखील दिसून येत होते लावण्यात आलेले वणवे वेळीच नियंत्रणात आणल्याने वन्यजीव संरक्षण संस्थेने समाधान व्यक्त केले.
मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर, मुख्य वनसंरक्षक कळसकर साहेब यांच्या निर्देशात साहाय्यक उपवनसंरक्षक अश्विनी खोपडे , वनक्षेत्रपाल अक्षय म्हेत्रे आणि सर्व वनकर्मचार्यांनी यावल अभयारण्यास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत त्या बद्दल वन्यजीव संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यावल अभयारण्यात वनविभागाचे संख्याबळ काही प्रमाणात कमी असले तरी, आहे त्या परिस्थितीत सर्वच कर्मचारी दिवसरात्र गस्त घालतांना दिसून आले ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तरी सध्याची परिस्थिती लक्षात घेता या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक शस्त्र असायला हवे होते हे प्रकर्षाने जाणवत होते.
यावल अभयारण्यास हळू हळू परत मिळत असलेले गतवैभव असेच टिकून राहावे म्हणून आम्ही सातपुडा बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही परत एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडे काही मागण्या मान्य करण्यासाठी ठराव करणार आहोत असे संस्था अध्यक्ष रवींद्र फालक यांनी सांगितले ,