चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील सोनल गौतम सैंदाणे (26) हा तरुण खदानीच्या पाण्यात पाय घसरुन पडल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना आज सकाळी घडली. त्याला नातेवाईकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. डॉ. सोहम पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक मधुकर पवार करत आहेत.