युवकांनी रक्तदान करण्याचे आवाहन…

जळगाव – शहरातील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बबलू( हर्षित) पिंपरिया यांच्या स्मूतीप्रित्यर्थ ज्ञान योगवर्ग, समस्त मित्र परिवार व इंडियन रेडकक्रॉस सोसायटी ,जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.10 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 2 यावेळेत
हर्षित अँड कंपनी ,172 ,विसनजी नगर ,ज्ञान योगवर्ग हॉल ,पप्पू पेपर किंगच्या बाजूला हे शिबीर होणार आहे.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बबलू पिंपरिया यांनी आपल्या दातृत्वाचा मोठा ठसा आपल्या हयातीत उमटविला असून त्याच्या स्मूतीप्रीत्यर्थ सामाजिक जाणिवेचे भान ठेवून गरजू रुग्णांना योग्य वेळेत रक्त पुरवठा उपलब्ध होण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, गाईसाठी पाण्याच्या हौदाचे अनावरण देखील यावेळी करण्यात येणार आहे.
राज्यात एक दिवसाचा पुरेल इतकाच रक्त साठा शिल्लक असताना आरोग्य यंत्रणेवर कोविडच्या पार्श्वभूमीवर मोठे संकट येऊन ठेपले असून राज्यात रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे वेळोवेळी राज्यात रक्तदान करण्याचे आवाहन करीत असून नागरिकांनी समाजकार्यात स्वयंपुर्ती पुढे यावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.







