जळगाव (प्रतिनिधी) – ‘विधानसभेत जेव्हा मला तिकीट नाकारण्यात आलं तेव्हा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता. मी तेव्हाच पक्ष सोडून निवडून आलो असतो’ असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केला. ‘निवडणुकांवेळी माझ्याकडे एबी फॉर्म तयार होता. राष्ट्रवादीतून मी निवडून आलो असतो. त्यावेळी अजित पवार, वळसे पाटील यांनी मला फोन केले होते. मी तेव्हाच जिंकलो असतो’ असं खडसे म्हणाले आहेत. एका वृत्त वाहिनीला आपल्या मुलाखातीत प्रतिक्रिया देताना त्यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.

खरंतर, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत भाजपचा निरोप घेतला. यावर पक्ष सोडण्यासाठी काही कारणं हवं म्हणून खडसेंनी मला विलन ठरवलं असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. यावर प्रत्युत्तर देताना खडसेंनी मोठी गौप्यस्फोट केला आहे.







