भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी असणार्या दाम्पत्याचा गुजरातमधील भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी असणारे रवी नाले (वय – ६३) आणि त्यांच्या सौभाग्यवती ललीता नाले ( वय – ६०) हे अहमदाबादमधील मणीनगर येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. त्यांचा मणिनगर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच गंगाराम प्लॉट परिसरावर शोककळा पसरली. आज सकाळी या दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.