डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते झाले उदघाटन
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथे रविवारी ३० एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात “स्त्रियांचे कामजीवन” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात सेक्सुअल मेडिसिन आणि असायट्रिक गायनॅकॉलॉजी या दोन विषयावर तज्ञ मार्गदर्शकांना महाराष्ट्रातून बोलवण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चर्चासत्रात स्त्री रोग तज्ञ संघटनेचे समिती अध्यक्ष डॉ. मदन कांबळे, डॉ. मनीषा महाजन,डॉ.अमित मुठे, डॉ.रचना कावेरी,डॉ. कविता तोडकर, डॉ. रेणुका अलसी, डॉ. मानवी वर्मा, डॉ. विजयश्री मुठे यांनी सखोल मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात पॅनल डिस्कशनमध्ये डॉ. नंदिनी आठवले, डॉ.अंजली भारुड, डॉ.विलास भोळे,डॉ. विजयश्री मुठे यांनी सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रम जळगाव स्त्री रोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ.सीमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेच्या सचिव डॉ. दीप्ती पायघन यांनी केले, तर सूत्रसंचालन सहसचिव डॉ.शितल भोसले यांनी केले.