चोपडा तालुक्यातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा ग्रामीण पोलिसांनी गावठी बनावटीच्या रायफलसह एका संशयिताच्या मुसक्या बांधल्या आहेत. चोपडा तालुक्यातील ग्रामीण पोलीस हद्दीत गलवाडे ते बुधगावजवळ ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन संशयित मोटारसायकलवर जात असताना रात्रीची गस्त घालणार्या पोलिसांना दोघावर संशय आल्यानंतर त्यांना थांबण्याचा इशारा केला. दुचाकीस्वारामागे बसलेल्या कांतीलाल दुरसिंग पावरा (रा.महादेव दोंदवाडे, ता.शिरपूर, जि.धुळे) याने दुचाकीवरून उडी मारुन अंधाराचा फायदा घेत पळ काढला. दुसरा संशयित आरोपी रमेश मालसिंग पावरा ३३, महादेव दोंदवाडे, ता.शिरपूर) यास अटक करण्यात आली तर संशयिताकडून रायफल जप्त करण्यात आली. हवालदार राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयित आरोपीकडून ८० हजार रुपय किंमतीची एक गावठी बनावटीची साडेचार फुट रायफल तसेच ६० हजार किंमतीची शाईन हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी असा एकूण एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. डीवायएसपी ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकातील शिंगाणे, राकेश पाटील अधिक तपास करीत आहेत.