बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ (प्रतिनीधी) : शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरातील न्यू एरिया वार्ड,इंडिया बॅटरी दुकानासमोर एक इसम गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्याच्या कब्जात गावठी पिस्टल मॅगझीन सह बाळगतांना मिळून आला आहे. याबाबत त्याला अटक करून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बाजारपेठ स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली. पांडुरंग टॉकीज परिसरातील न्यू एरिया वार्ड, इंडिया बॅटरी दुकानासमोर रोडवर सार्वजनिक जागी सोमवार दि. १८ रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी रणजित किशोर चंडाले (वय ३२, रा. ७२ खोली, वाल्मिकी नगर भुसावळ) हा कोणतातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल मॅगझीन सह, त्याची किंमत २५ हजार रुपये असे घातक हत्यार ताब्यात बाळगून फिरत असतांना मिळून आला. त्याला अटक करण्यात आली आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोकॉ.राहुल वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कार्यवाही जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी,अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पडघन, पोलिस उप निरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ यासीन पिंजारी, महेश चौधरी, समाधान पाटील, विजय नेरकर, सचिन चौधरी, जावेद शहा, भूषण चौधरी, प्रशांत सोनार यांनी केली आहे.