जळगाव तालुक्यात कुसुंबा येथे पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथील एका हॉटेल परिसरामध्ये तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून गावठी बंदूक व २ जिवंत काडतूस असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनने ही कामगिरी केली.
तुषार अशोक सोनवणे (वय २५, रा.खेडी आव्हाने, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके,कॉन्स्टेबल छगन तायडे, किरण पाटील, राहुल घेटे आदी पथकाने कुसुंबा जवळील नशिराबाद रोडकडे हॉटेल पुष्पा जवळ दुचाकीवर बसलेल्या तरुणाला हेरले.त्याला ताब्यात घेत असताना तो पळू लागला. तेव्हा त्याला पाठलाग करून शिताफीने पकडले. त्याच्या कमरेला २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व २ हजार रुपये किमतीचे २ जिवंत काडतूस तसेच ५० हजार रुपयाची होंडा शाईन दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे व नाईक योगेश बारी करीत आहेत.