वरणगाव पोलीस स्टेशनची कारवाई
अटक करण्यात आलेल्या ता. व्यक्तीचे नाव कविन बाबू भोसले (वय २५, रा. हलखेडा, मुक्ताईनगर) असे आहे. फरार संशयिताचे नाव सुजल चट्टान पवार (रा. हलखेडा) असे आहे. झेडपी दरम्यान सुमारे ३० हजार रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाचा गावठी कट्टा, ४ हजार किमतीचे जिवंत काडतूस व मुलांच्या खेळण्याच्या नोटांचे ९ बंडल तसेच एक दुचाकी व मोबाईल असा सुमारे ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पो. कॉ. मनोज म्हस्के यांच्या फिर्यादीवरून १ रोजी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पीएसआय मंगेश बेंडकोळी प्रशांत ठाकूर, ईश्वर तायडे आणि अन्य पोलिस कर्मचारी सहभागी होते. पुढील तपास अमलदार सुधाकर शिंदे करीत आहेत.