रावेर तालुक्यातील रणगाव येथे एलसीबीची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – गावठी कट्टा कमरेला लावून गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताच्या रणगाव (ता. रावेर) येथे एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला.
किरण ब्रिजलाल कोळी (वय २४, रा. रणगाव) असे संशयिताचे नाव आहे. रणगाव येथे तरुण गावठी कट्टा बाळगुन गावात भिती निर्माण करत आहे, अशी गोपनीय माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना शनिवारी ९ ऑगस्ट रोजी मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ येथून पथकाला रवाना केले. पथकाने रणगाव येथे सापळा लावून तपासाचे चक्र फिरविले. पथकाच्या तावडीत आलेल्या संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक गावठी कट्टा मिळुन आला. किरण कोळी याला ताब्यात घेत पथकाने सावदा पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार प्रितम पाटील, हवालदार नितीन बाविस्कर, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबल बबन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर निकम, चालक हवालदार भारत पाटील यांच्या एलसीबी पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.