चोपडा ( प्रतिनिधी ) – पोलीस महानिरीक्षकांचे पथक आणि चोपडा ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आज गावठी कट्टा विकत घेणार मुंबईचा आरोपी आणि विकणारा आरोपी पकडून त्यांच्या ताब्यातून कट्टा जप्त केला आहे
या पथकाने गावठी कट्टा घेणारा मो.वसीम सुलतान शेख ( वय 22,रा.साईबाबा मदिर जवळ जिजामाता नगर भोसले मार्ग अहिल्याबाई चाळ अण्णा भाऊ साठे नगर मुंबई ) आणि कट्टा देणारा गुरूदेवसिंग उर्फ खटका लिवरसींग बडोल ( रा.पार उमर्टी ता.वरला जि.बडवाणी , मध्यप्रदेश) यांना अटक केली त्यांच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोल्स ठाण्यात शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याचं कलम ३ / २५ व ७ / २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चोपड्यात गावठी कट्टा विकणारा आणि घेणाराही पकडलाआज पोलीस महानिरीक्षक यांचे विशेष पथक व चोपडा ग्रामीण पोलिसांच्या सयुक्त कारवाईत पो नि बापू रोहम, सपोनि सचिन जाधव, सपोनि बशिर तडवी, हे कॉ रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, पो ना मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, राकेश पाटील, रितेश चौधरी किरण पाटील सहभागी झाले होते ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.