तालुका पोलीस स्टेशनची कारवाई ; सव्वा लाखांचा मुद्देमाल नष्ट
जळगाव;- तालुक्यातील देऊळवाडे शिवारात तापी नदीच्या किनाऱ्यावर अवैधरित्या गावठी दारूची हातभट्ट्टी तालुका पोलिसांनी उध्वस्त केली असून याप्रकरणी एका अटक केली आहे. तसेच याठिकाणी दारूला लागणारे रसायन , ड्रम , १२० लिटर तयार दारू असा एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवरच नष्ट केला आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तालुका पो स्टे हद्दीत मौजेदेऊळवाडे शिवारात जंगलात व तापी नदीकिनारी सकाळी पहाटे ५ वाजेपासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत ४ हातभट्ट्या उद्वस्त करण्यात आल्या तसेच यावेळी ५८ ड्रम लोखंडी व प्लास्टिक चे ड्रममध्ये त्यात ८ हजार १०० लिटर कच्चे रसायन १२० लिटर तयार गावठी हटभट्टीची दारू किंमत ३ हजार ६०० रुपये असे एकूण १ लाख १९ हजार ६०० रुपयेचा माल मिळून आला . सर्व ड्रम फोडून नष्ट करण्यात आलेले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे पोहेकॉ साहेबराव पाटील, संजय चौधरी, बापु पाटील, राजेश पाटील, विलास शिंदे, विजय दुसाने, अनिल मोरे, मनोज पाटील, महेंद्र सोनवणे, भुषण सपकाळे, ज्ञानेश्वर कोळी, दिपक कोळी, दिपक राव यांनी ही कारवाई केली.