शिरसोलीत एक्स्पायरी डेट मसाल्याच्या विक्रीतून उघडकीस आला प्रकार
जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील शिरसोली येथे आज श्रावण महिन्यानंतर कर दिनी अनेक जण मांसाहारी जेवणाचा बेत आखतात . त्यानुसार येथील एका व्यक्तीने ७०० रुपयांचा गावरान कोंबडा आणला . मात्र किराणा दुकानातून मसाला घेतल्यानंतर हा मसाला एक्स्पायरी डेट झालेला असल्याने भाजी शिजल्यानंतर त्यावर किडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आल्याने याप्रकारानंतर गावात खळबळ उडाली असून याबाबत अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याची माहिती ग्रामस्थ बापू विठ्ठल बोबडे यांनी केसरीराजशी बोलताना दिली .
गावात अशोकनगर भागात मामा नावाने किराणा दुकान असून बापू बोबडे यांनी आज करीदिनानिमित्त घरी मांसाहारी जेवण करण्याचे नियोजन केल्यानुसार त्यांनी गावातून गावरानी कोंबडा आणला होता. यासाठी भाजी बनविण्यासाठी लागणारा मसाला घेण्यासाठी आपल्या मुलीला दुकानात पाठविले. तिथे आरबीएम कंपनीचा स्पेशल मटण मसाल्याचे पाकीट विकत घेतले. . मात्र भाजी झाल्यानंतर भाजीत किडे आढळून आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला . मसाला तयार केल्याची तारीख १३ ऑगष्ट २०२० असून त्याची एक्स्पायरी तारीख हि १२ नोव्हेंबर २०२१ असल्याने हा मसाला एक वर्षांनंतरही दुकानात विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. तसेच इतर किराणा सामान देखील एक्सपायर झाल्यानंतरही विक्री होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. तसेच गावातील अनेक किराणा दुकानांमध्ये अशा वस्तूंची विक्री होत असून नागरिकांच्या विश्वासाला यामुळे तडा गेला असून अशा विक्री होणाऱ्या दुकानांची संबंधित विभागाने तपासणी करून मालाची एक्स्पायरी डेट तपासणी करून अशा दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बापू बोबडे यांनी बोलताना व्यक्त केली. तसेच अशा दुकानांवर होणारी विक्री थांबविण्यात येऊन ती दुकाने बंद करण्याचीही मागणी बोबडे यांनी व्यक्त केली .
दरम्यान किराणा दुकानांमधून सर्वसामान्य ग्राहक हा दुकानदारांकडून विश्वासाने वस्तूंची खरेदी करीत असतो. यात जीवनावश्यक खाद्य सामनाचाही समावेश होत असून एक्सपायर झालेला माल विक्री हुन तो कुणाच्या जीवावर उठू नये यासाठी विभागाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.