जळगाव ( प्रतिनिधी ) – गावांच्या विकास कामांसाठी आवश्यक पाठपुरावा आणि निधीत कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नसून गरजेनुसार निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सोनवद व अंजनविहीरे येथील विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन तसेच शिवसेना , युवासेना आणि महिला शिवसेनेच्या शाखां उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील होते. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोनवद येथील िल्हा परिषदेच्या शाळेच्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण तसेच सिमेंट बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन आणि संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील 20 लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले अंजन विहीरे येथे ग्रामपंचायतीजवळच्या झिरी नदीवरील काँक्रीट बंधाऱ्याचे भुमीपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि प सदस्य गोपाल चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, राजेंद्र चव्हाण, किशोर पाटील, डि ओ पाटील, पवन पाटील, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल पाटील, नंदलाल पाटील, प्रदीप पाटील, सोनवदच्या सरपंच आशा पाटील, दामू पाटील, तुकाराम पाटील, बबलू पाटील, शाखाप्रमुख पुंडलिक पाटील, रवींद्र चव्हाण, संजय पाटील उपस्थित होते.







