जळगावात हनुमान नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील हनुमान नगरात राहणारे ४२ वर्षीय प्रौढ व्यक्ती हे गटारीत पडल्याने त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शंकर मधुकर बाऊस्कर (वय ४२ रा. हनुमान नगर, जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. जळगाव शहरातील हनुमान नगरात शंकर बाऊस्कर हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला होते. सोमवारी दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच परिसरात असलेल्या गटारीत पडल्यामुळे शंकर बाऊस्कर हे गंभीर जखमी झाले. ही घटना त्यांच्या मुलाच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच वडीलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.