एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील कासोदा येथे काही दिवसांपूर्वी भीषण गॅस हंडीचा स्फोट झाला होता. या स्फोटात आठ जण जखमी झाले होते. यातील गंभीर जखमी सागर किसन सूर्यवंशी याचा शुक्रवारी रात्री १० वाजता उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कासोदा गावात शोककळा पसरली आहे.
कासोदा गावी रविवार दिनांक ६ रोजी गॅसच्या गळतीत झालेल्या स्फोटात ८ जण जबर भाजले गेले होते. त्यातील सागर किसन मराठे (सूर्यवंशी) (३२) याचा शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. जळगाव येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.
गॅस गळती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अनिल मानकीवाले यांच्या घरात गॅस गळती होऊन भीषण आग लागली होती. यात आठ जण जबर भाजले गेले होते. या सर्वांवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात सागर मराठे याची मृत्यूशी असलेली झुंज संपली. त्याचे पश्चात आजी, आई, वडील, पत्नी व दीड महिन्याचा मुलगा असा परिवार आहे