जळगाव ( प्रतिनिधी ) – आजीचे निधन झाल्याने बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या गणपतीनगरातील घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी ५७ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आपले आहे .
गणपतीनगरात विलास सोनवणे कुटुंबासह राहतात . त्यांच्या आजीचे निधन झाल्याने ते परिवारासह १४ नोव्हेंबर रोजी कंडारी येथे गेले होते. त्यांना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांच्या शेजारी राहणारे श्यामलाल आहुजा यांनी फोन करून त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसत असल्याचे सांगितले होते. विलास सोनवणे यांनी घरी येऊन पाहिल्यावर त्यांना घरातील कपाटाचे दरवाजे आणि कुलूप तोडलेले दिसले . अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घरातून १५ हजारांचे दागिने , रोख ३० हजार रुपये , टी व्ही , २ पाण्याच्या मोटारी , २ गॅस सिलिंडर्स , गौतम बुद्धाची मूर्ती व १० साड्या असा ५७ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले. विलास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.