जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हापरिषदेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त सीईओपदी गणेश चौधरी यांची नियुक्तीचे आदेश राज्यशासनाने गुरुवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी काढले. वर्षभरापासून हे पद रिक्त होते.
जिल्हा परिषदेमध्ये वर्षभरापूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यानंतर या पदावर प्रभारी म्हणून विनोद गायकवाड हे पदभार सांभाळत होते. गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या बदली पदस्थापना आदेशामध्ये गणेश चौधरी यांची जिल्हापरिषदेच्या अतिरिक्त सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.