• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2023
in Uncategorized
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजरा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंतीनिमित्ताने आयोजीत अहिंसा सद्भावना शांती यात्राचे  २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आले आहे. शास्त्री टॉवरपासून निघून नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रा येईल.

या सद्भावना शांती यात्रेत पाणी पुरवठा मंत्री  गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एन. माहेश्वरी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव महानगर पालिकेच्या प्रशासक विद्या गायकवाड, के.सी. ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आदी मान्यवर निमंत्रीत आहेत. सोबत शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोच्या संख्येने यात सहभागी होणार आहेत.

रॅलीनंतर महात्मा गांधी उद्यानात होणाऱ्या विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये  अनुराधा शंकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मध्यप्रदेश ह्या प्रमुख अतिथी असून, अध्यक्ष म्हणून  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितीतांना गांधीजींचे पणतु तुषार गांधी हे अहिंसेची शपथ देणार आहेत.  सर्वांनी मोठ्या संख्येने ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेत’ सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ या, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले आहे.

चरखा जयंतीनिमित्त अखंड सूत कताई

महात्मा गांधींनी चरखा किंवा चरखा हे राजकीय मुक्तीसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरून, ‘प्राचीन कार्य नीतिमत्तेचे’ रूपक म्हणून आणि ब्रिटिश राजवटीला आर्थिक आणि सामाजिक प्रतिक्रियेचे प्रतीक म्हणून वापरले. २ ऑक्टोबर ह्या दिवशी चरखा जयंती ही साजरी केली जाते.  त्या निमित्ताने गांधी तीर्थ येथे अखंड सूत कताई होणार आहे. महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने गांधीतीर्थ सुरू राहणार आहे.

“खानदेश में महात्मा गांधी” पुस्तकाचे प्रकाशन

खानदेशात गांधीजी आलेत व खानदेश गौरवान्वित झाला. लोकमान्य टिळक फंडाच्या निमित्ताने गांधीजी खानदेशात आले तेव्हा त्यांचे कमालीच्या उत्साहात  सर्वत्र स्वागत झाले. मानपत्रे व भेटवस्तु देण्यात आल्यात. त्यांचा लिलाव करून ती रक्कम फंडात जमा झाली. अशा अनेक घटनांची नोंद असलेल्या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण

गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी  शालेय विद्यार्थ्यांसाठी कांताई सभागृहात गांधीतीर्थद्वारे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. इ. ५ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमानंतर लगेचच पारितोषिके देखील मान्यवरांच्याहस्ते प्रदान होणार आहेत.


 

 

Tags: #gandhi risarch foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/gandhi-risarch-foundetion-4/
Previous Post

विविध गावागावांत उद्या सकाळी महाश्रमदानाचे आयोजन

Next Post

चोरट्यांचा सलग घरफोडीचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने विफल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोरट्यांचा सलग घरफोडीचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने विफल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon