जळगाव (प्रतिनिधी) – येथील आदिवासी बहुल परिसर असलेल्या बोरअजंटी येथे गांधी रिसर्च फाउंडेशन आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. त्यासाठी फॉरेस्ट ऑफिसर, आरएफओ आणि बोरअजंटी ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तसेच स्थानिय युवाशक्तीने संघटीत होऊन खऱ्या अर्थाने वृक्षारोपण व हिर्वाई वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केवळ वृक्षारोपण करणे हा मु्ख्य उद्देश नसून वृक्ष संगोपण देखील आहे. कार्यक्रमासाठी गावातील ग्रामसेवक, आशावर्कर, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील व युवाकार्यकर्त्यांनी परिश्रम घेतली.








