जळगाव (प्रतिनिधी) – व्यसनमुक्तीचे प्रवर्तक नितीन विसपुते यांचे दि. २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तरसोद येथे व्यसनमुक्ती या विषयावर कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नितीन विस्पुते हे मानस तज्ञ असून गेल्या बारा वर्षापासून चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून ते समाज व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहे. भक्ती मार्गातून प्रबोधन चांगले होते हा आजपर्यंतचा अनुभव आहे.
आज आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यसनांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चालल्याचे दिसून येते. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी हे कीर्तन आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संध्याकाळी ६ वाजता रीक्षा स्टॉप मराठी शाळेजवळ, तरसोद येथे व्यसनमुक्ती या विषयावर कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी कीर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी अशी विनंती आयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे.