रामेश्वर कॉलनी परिसरात हळहळ
जळगाव प्रतिनिधी : शहरांतील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रांजल रमेश ठाकूर (वय १६), रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हिने अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच तिचे वडील रमेश शांताराम ठाकूर यांनी तिला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती तिला ‘मृत’ घोषित केले.
या घटनेनंतर सिव्हिल हॉस्पिटलमधून प्राप्त झालेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहेत. त्यांना पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.








