जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील २२ वर्षीय तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केली असली तरी मित्रांनी पैशांसाठी छळल्याने त्याने आत्महत्या केली असून तिघांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयताच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे.
सविस्तर याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोरख अशोक कोळी (वय-२२ , रा. हरविठ्ठल नगर जळगाव ) असे मयत तरूणाचे नाव आहे.
गोरख कोळी आई आणि लहान भावासह वास्तव्याला आहे. बांधकामाच्या ठिकाणी सेंटींग काम करून उदरनिर्वाह करत होता. गोरख कोळी मित्र सोनू कोळी याच्यासोबत राहत होता.
सोमवारी घरी कुणीही नसतांना गोरखने घरात दुपारी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर पोलिसांना कळवण्यात आले
दरम्यान, गोरख कोळी यांचे मामा प्रल्हाद कोळी हे रामेश्वर कॉलनीत राहतात. गोरखने आत्महत्या केली नसून त्याला गळफास देण्यात आला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. काही दिवसांपासून गोरखचा मित्र सोनू कोळी आणि इतर दोन जण त्याच्याकडे दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागत होते. पैसे दिले नाही म्हणून तिनही मित्रांनी संगनमताने त्याला गळफास दिला आहे असा आरोप मयत गोरखची आई आक्का आणि मामा प्रल्हाद कोळी यांनी केला आहे. घटनास्थळी संशयास्पद स्थितीत गळफास घेतल्याचे आढळून आले आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.को. ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत .