अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने अमळनेर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. ६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भालेराव नगरात घडली.
निकिता रविंद्र पाटील (वय १९, रा. भालेराव नगर, अमळनेर) असे मयत मुलीचे नाव आहे. ती मुख्य बाजार पेठेतील सानेगुरुजी संकुलात असलेल्या रामभाऊ चहावाले दुकानाचे मालक रविंद्र रामकृष्ण पाटील यांची मुलगी होती. नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाला तिने प्रवेश घेतला होता. गेल्या वर्षी अखेरच्या वर्षाला असताना परीक्षा दिल्यानंतर सुट्या लागल्याने अमळनेरात आली होती. सोमवारी दि. ६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता ती व तिची आई घरात दोघेच होते.
तेव्हा निकिताने तिच्या रूममध्ये जाऊन छताच्या पंख्याला गळफास घेतला. अर्ध्या तासाने ही घटना तिच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर तिने आक्रोश केला. आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने तिला रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.