जळगाव : – घरी कोणीही नसताना आरेफाबी जमील खाटीक (वय ३६, रा. राम नगर मेहरुण परिसर ) या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. ७ रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील मेहरुण परिसरातील आरेफाबी जमील खाटीक या महिला वास्तव्यास होत्या. त्या घरी एकट्याच असतांना त्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री कुटुंबातील सदस्य घरी आले असता, त्यांना महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी लागलीच घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.
त्यानंतर महिलेला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहेत.