फैजपूर पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत यंदा अनेक बरेच मोबाईल गहाळ बाबत संबंधीत मोबाईलधारक यांनी तक्रार दाखल केलेल्या होत्या. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर एसपी अशोक नखाते,सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह यांनी वेळोवेळी मासीक क्राईम मिटींग दरम्यान गहाळ मोबाईल हस्तगत करणेबाबत सूचना दिल्या होत्या. मोबाईल धारकांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे तांत्रीक विश्लेषण करुन सायबर शाखा व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांची मदत घेवून फैजपुर पोलीसांनी एकुण १२ मोबाईल अंदाजे १ लाख रुपये किमतीचे हस्तगत करुन ते मुळ मोबाईल धारकास आज गुरुवारी दि. ९ मे रोजी सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह यांचे हस्ते परत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगीरी फैजपुर पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश वाघ, पो. उप निरी. विनोद गाभणे, पोहेकों. गुलबक्ष तडवी, मपोहेकॉ. मदीना तडवी, मपोहेकों हर्षा चौधरी, पो.कॉ. शारदा देवगिरे, पोकॉ. जुबेर शेख यांनी तसेच वाचक शाखेचे पोकों गौरव पाटील व स्थागुशाचे पोना ईश्वर पाटील अशांनी केली आहे.