जळगाव ;- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या पार्थिवावर आज ईदगाह कब्रस्थान येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला .
हाजी गफ्फार मलिक यांचे काल रात्री निधन झाले होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी उपमहापौर करीम सालार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील महाजन, इकरा कॉलेजचे माजी प्राचार्य इकबाल शहा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. दरम्यान हाजी गफ्फार मलिक यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.