सुकमा जिल्ह्यातील घटना
गडचिरोली : -. या ठिकाणी चकमक झाली . छत्तीसगडमध्ये आज नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. आयईडीचा ब्लास्ट करुन नक्षलवाद्यांनी जवानांच्या ट्रकला उडवून दिले. मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या सीमाभागांत मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी मोहीमा सुरु आहेत. या कारवाईत आतापर्यंत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे
सुकमा जिल्ह्यात शिलेघर ते टेकुलगुडमच्या दरम्यान कोब्रा बटालियनचे जवान एका ट्रकमधून जात होते. त्यावेळी आयईडीचा स्फोट माओवाद्यांनी घडवून आणला. या स्फोटात दोन जवान घटनास्थळी शहीद झाले आहेत. घटनास्थळी अतिरिक्त मदत पाठवण्यात आली असून शहीद जवानांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.