पाचोरा ;- महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ तर्फे आयोजित बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा” फुलपाखरू” या बालनाट्य नाटकाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व कामगार कल्याण मंडळ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव येथे आयोजित बालनाट्य विभागीय स्पर्धेत विद्यालयाचा संघाने” फुलपाखरू” या नाटकाचे सादरीकरण केले. सदरची स्पर्धा महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळातर्फे विभागीय स्तरावर घेण्यात आली. यामध्ये विद्यालयाच्या संघाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या नाटकातील बालकलाकार वैष्णवी नाईक हिला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या नाटकात बालकलाकार म्हणून वैष्णवी अस्वार, नियती अस्वार, पायल बारी ,दिव्या भामरे. यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. नाटकाचे दिग्दर्शन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत कुमावत यांनी केले .सदर बाल कलाकारांचे व शिक्षकांचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षिका सुरेखा दुबे, ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील, अशोक बावस्कर, सुनील भदाणे, दीपक कुलकर्णी, मनीषा बारी तसेच संस्थेचे चेअरमन, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी मंडळाचे सदस्य ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बालकलाकारांचे कौतुक केले.