बेशिस्त वाहनधारक आणि अतिक्रमणावर संयुक्त कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) सध्या जळगाव जिल्हा अनलॉक झाल्याने नागरिकांचा शहरात वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे . मात्र कोरोनाचे नियम पाळून जास्तीत जास्त गर्दी आणि बेशिस्त वाहनांची पार्किंग , अतिक्रमण पुन्हा वाढले आहे . त्यामुळे आज ११ रोजी सकाळी स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी फुले मार्केटमध्ये जाऊन पाहणी करून कारवाईच्या सूचना पथकाला दिल्या. त्यामुळे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह मनपा कर्मचाऱयांनी बेशिस्त वाहने, अतिक्रमणधारकांवर कारवाई केली. यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी फुले मार्केटमध्ये २०० पेक्षा अधिक दुकाने असून याठिकाणी अतिक्रमण आणि वाहने अस्ताव्यस्त लावल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हि कारवाई होत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.