जळगाव (प्रतिनिधी) : – भुसावळ विभागाने अवैध प्रवास-विरोधी मोहीम तीव्र केली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये भुसावळ विभागात सखोल तिकीट तपासणीचा परिणाम म्हणून विनातिकीट,अनधिकृत प्रवासाच्या एकूण ५९ हजार प्रकरणांतून रु. ४. ६७ करोड दंड वसूल करण्यात आला. फेब्रुवारी -२०२४ च्या दिलेल्या प्रत्यक्ष उद्दिष्टापेक्षा २६.१९ %ने हा दंड अधिक आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. भुसावळ विभाग विनातिकीट आणि अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणीचे आयोजन करीत असते. सर्व रेल्वे वापरकर्त्यांना सुखकर प्रवास आणि उत्तम सेवा मिळावी हा उद्देश आहे. विनातिकीटप्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत..
फेब्रुवारी २०२४ च्या ५९ हजार प्रकरणांच्या उद्दिष्टापेक्षा हे प्रमाण २.३३ % अधिक आहे. यातून रु. ४.६७ कोटी महसूल मिळाला आहे. फेब्रुवारी -२०२४ च्या दिलेल्या प्रत्यक्ष उद्दिष्टापेक्षा २६.१९ %ने अधिक आहे. फेब्रुवारी महिन्यात अनियमित प्रवासाची एकूण २८.८२ लाख प्रकरणे नोंदवली आहेत. त्यातून रु १. ४० कोटीचा दंड वसूल झाला असून विनातिकीट प्रकरणांमधून एकूण ३० लाख प्रकरणे आहेत. त्यातून रु २.९२ कोटीचा दंड वसूल आणि सामानाच्या बुक न केलेल्या एकूण ४० प्रकरणांमधून ८ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.