जळगाव;- फुफणी ग्रामपंचायत व डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोतिबिंदू तपासणी शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. हे सर्व फुफणी सरपंचाच्या पुढाकारातून शक्य झाले असून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे ७३ नागरिकांना दृष्टी मिळाली आहे.
या शिबिरात डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी तपासण्ी केली. शिबिराचा १८७ नागरिकांनी लाभ घेतला. त्यापैकी ७३ नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज असल्याने पुढील उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात पाठवण्यात आले. या शिबिरात सर्व नागरीकांची ईसीजी व शुगर तपासणी करण्यात आली. कोरोना काळात गरजू लाभार्थी उपचारापासून काही दुर राहीले ही बाब सरपंच डॉ.कमलाकर पाटील यांनी आयोजित केलेल्या या शिबिराने दूर होऊन मार्ग सुकर झाला. उपस्थीत मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी केले. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी, पाठपुराव्यासाठी छोटेखानी शिबिरे आयोजित करु असेही डॉ.पाटील यांनी जाहिर केले.
या प्रसंगी नेत्र विभागाच्या निवासी डॉ. कल्पना देशमुख, हृदयालयातील डॉ. प्रियंका भालके, यांच्यासह इन्टर्न रुएल रॉड्रीग्ज, हिमांशु साखरे, अनुष्का सुवर्ण, स्वाती सूची आदिंनी रुग्णांची तपासणी केली तसेच रुग्णालयात आलेल्या नागरिकांवर तज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियाही केली.