• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात बांधकाम व्यवसायिकाची ७० लाख रुपयात फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात बांधकाम व्यवसायिकाची ७० लाख रुपयात फसवणूक

शिरसोलीच्या शेतकऱ्यासह एजंटवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गणेशवाडी परिसरात राहणाऱ्या तरुण बांधकाम व्यवसायिकाची ७० लाखात फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी धीरज पाटील यास शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दि.१७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पियुष कमलकिशोर मणियार (वय-२६ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मणियार मल्टीसर्व्हिसेस नावाने बांधकाम व्यवसाय असुन ऑफीस गोविंदा रिक्षा स्टापजवळ आहे. त्यांचे शेजारी राहत असलेला अमरनाथ मंगेश ठाकुर, रा. गणेशवाडी याने रियल इस्टेट एजेंट धिरज विजय पाटील, (रा.प्लट नं.१३, जयविजय बिल्डींग, रिंगरोड, जळगाव) याला फिर्यादीच्या जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपच्या ऑफीसला घेवुन आला. त्यावेळी धिरज पाटील याने त्याचेकडे शिरसोली प्र.बो., ता. जि. जळगाव येथे शेती असल्याचे सांगीतले.

फिर्यादिने धिरज पाटील यास सर्व माहिती विचारून शेत जमिन दाखविणेबाबत सांगीतले. त्यानुसार दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी शिरसोली प्र.बो. येथील गट नं.२२३/३ येथे धिरज पाटील मोटार सायकलवर घेवुन गेला. फिर्यादीने क्षेत्र पसंत करून गट नं.२२३/३ चा ऑनलाईन ७/१२ पाहिला असता सदर शेतजमिन हि रविंद्र शांताराम पाटील व दत्तु शांताराम पाटील असे सामाईक क्षेत्र असल्याचे दिसुन आली. धिरज पाटील यास सदर शेतमालकासोबत भेट करून देणेकरिता फिर्यदिने सांगीतले.

त्याने शेतकरी रविंद्र शांताराम पाटील याचे सोबत त्याने सौदा पावती केलेली असुन तोच सदर शेतजमिनीचा मालक असुन फक्त खरेदीसाठी मालक रविंद्र शांताराम पाटील येईल असे सांगीतले.

दुसऱ्या दिवशी एजंट धिरज पाटील शेतकरी रविंद्र शांताराम पाटील यास फिर्यदिला ऑफीसला घेवुन आला. तेव्हा त्यांचे सोबत बैठक करून देवुन सदर शेतजमिनीचा भाव ठरवुन एकूण क्षेत्र १.२६ आर पैकी ०.६३ आर शेतजमिन हि ९० लाखात घेण्याचा व्यवहार ठरला. सदर व्यवहाराचे दिवशी आमचे सोबत अमरनाथ मंगेश ठाकुर, भाऊ आयुष कमलकिशोर मणियार, अमोल अशोक धांडे असे हजर होते. धिरज पाटील याने त्याचा व्यवहार हा शेतकरी रविंद्र पाटील याचे सोबत झाला असल्याचे सांगीतलेले असल्याने मी त्यांचा झालेला सौदा पावतीचा करारनामा व्यवहार रद्द करणेबाबत सांगीतले. त्यावेळी त्याने रविंद्र पाटील व धिरज पाटील यांच्यात झालेला दिनांक १५ मे २०२३ रोजीचा सौदापावती करारनामा रद्द झालेबाबतचा करारनामा दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी केलेला आहे. मी त्याच दिवशी शेतकरी रविंद्र शांताराम पाटील यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यावर माझे एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून चार लाख रूपये आरटीजीएसद्वारे दिलेले आहेत. तसेच सव्वीस लाख रूपये रोखीने असे एकूण तीस लाख रूपये शेतकरी रविंद्र शांताराम पाटील यांना धिरज पाटील यांचे मध्यस्थीने तो समक्ष हजर असतांना दिलेले आहेत.

शेतकरी रविंद्र शांताराम पाटील व माझेत सदरचा व्यवहार नव्वद लाख रूपये असा ठरला असलेबाबत दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी सौदापावती करारनामा लिहून दिलेला आहे. तरी त्यांनतर धिरज पाटील व शेतकरी रविंद्र पाटील यांनी त्यांचा जयदिपसिंग रविंद्रसिंग पाटील, रा.एसएमआयटी कॉलेज जळगाव यांचेशी सदर शेतजमिनीचा व्यवहार झालेला असुन तो रद्द करावयाचा असल्याने अजुन पैसे दया असे धिरज पाटील याने सांगीतले. त्यावेळी त्यांना सदरचा व्यवहार हा पुर्ण करा व पैसे लगेच घ्या असे सांगीतले. परंतु ते ऐकत नसल्याने दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी रविंद्र शांताराम पाटील यांना दहा लाख पंधरा हजार रूपये व दोन लाख ५ हजार रूपये असे एकूण बारा लाख वीस हजार रूपये माझे एचडीएफसी बँकेच्या खात्यातुन आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर केले.

संपूर्ण रक्कम हि रविंद्र पाटील यास मिळाल्यानंतर जयदीपसिंग रविंद्र पाटील व रविंद्र शांताराम पाटील यांनी दि.६ जून २०२३ रोजी त्यांच्यात झालेला सौदा पावती करारनामा रद्द झालेबाबत रद्द करारनामा केलेला आहे. त्यानंतर मी दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी शेतकरी रविंद्र पाटील याचे बंक खात्यावर १९ लाख रूपये व ९ लाख अठ्ठावीस हजार रूपये असे एकूण २८ लाख २८ हजार रूपये फिर्याडीच्या एचडीएफसी बँक खात्यावरून आरटीजीएस केलेले आहेत. तरी मी रिअल इस्टेट एजंट धिरज विजय पाटील यांचेवर विश्वास ठेवुन त्याचे मध्यस्थीने शेतकरी रविंद्र शांताराम पाटील यास एकुण रक्कम ७० लाख ४८ हजार रूपये रोखीने व आरटीजीएसद्वारे देवुनही शेतकरी खरेदी खत करून देणेसाठी आलेला नाही.

खरेदी खत रजिस्ट्रेशन करणेसाठी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी एकूण ४ लाख ३२ हजार रूपये शासकीय चलन भरलेले आहे. तसेच मी शेतकरी यास पैसे देणेसाठी ५ लाखाचे चार चेक असे चेकवर सहया करून शेतकरी रविंद्र पाटील यास देणेसाठी बनवुन ठेवले होते. तरी देखील शेतकरी रविंद्र पाटील यांचेशी झालेला सदरचा व्यवहार पुर्ण करण्याची जबाबदारी असतांना एजंट धिरज विजय पाटील हा रविंद्र पाटील यांना रजिस्टेशन करिता सोबत घेवुन आलेला नाही. त्यावेळी मी शेतकरी रविंद्र पाटील यास फोन केला असता त्यांने सांगीतले की, एजंट धिरज पाटील याने त्याचे पैसे दिलेले नसल्याने तो शिरसोली प्र.बो. ता. जि. जळगाव गट नं. २२३/३ क्षेत्र १.२६ आर पैकी ०.६३ आर शेत जमिनीचा व्यवहार पुर्ण करू शकत नाही म्हणुन खरेदी खत दस्ताएवज रजिस्टेशन करून देणेसाठी येत नसलेबाबत कळविले.

लगेच धिरज पाटील यास त्याबाबत विचारणा करणेसाठी फोन केला असता त्याने फिर्यादीला शेतकरीला घेवुन येतो ती माझे जबाबदारी आहे काळजी करू नको असे म्हणुन मनधरणी केली. परंतु सायंकाळपावेतो शेतकरी रविंद्र पाटील व एजंट धिरज पाटील असे आले नाहीत, त्यांनतर देखील धिरज विजय पाटील यास वारंवार फोन करून खरेदी खत रजिस्ट्रेशन करून देणेसाठी सांगीतले असता त्याने मी शेतकरीला घेवुन येतो असे सांगुन शेतकरी व एजंट दोघे खरेदी खत रजिस्ट्रेशनसाठी आलेले नाहीत.

एजंट धिरज विजय पाटील, रा.रिंगरोड जळगाव व शेतकरी रविंद्र शांताराम पाटील, रा.शिरसोली, ता.जि.जळगाव यांनी मी दिलेल्या ७० लाख ४८ हजार रुपये रकमेचा अपहार करून फसवणूक केलेली आहे म्हणुन माझी दोघांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी धीरज पाटील यास अटक केली आहे. संशयीत आरोपी धीरज पाटील यास शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दि.१७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


 

Previous Post

दूषित पाण्यामुळे असंख्य मासे मृत्युमुखी, मच्छीमारांचे लाखोंचे नुकसान

Next Post

गोदावरीच्या गीत गोविंद मैफीलीत रसिक चिंब भिजले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरीच्या गीत गोविंद मैफीलीत रसिक चिंब भिजले

गोदावरीच्या गीत गोविंद मैफीलीत रसिक चिंब भिजले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon