जळगाव ( प्रतिनिधी ) – क्रेडीटकार्डाचे वार्षिक शुल्क माफी करायची असेल तर मोबाईलवर आलेला ओटीपी विचारत ६३ हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली फसवणुक करणार्या तरुणीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
एमआयडीसी परिसरातील रहिवाशी शिवकुमार तिवारी (वय-४५) खासगी नोकरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे दोन क्रेडिट कार्ड आहेत.वार्षीक शुल्क लागत असल्याने त्यांनी २४ नोव्हेंबररोजी कस्टमर केअरला कॉल करुन विनंती केली होती. २७ नोव्हेंबररोजी दुपारी तिवारी यांना एका महिलेचा कॉल आला. मै स्टेट बँक ऑफ इंडियासे बात कर रही हूँ.. आपको वार्षिक शुल्क नाही चाहीए तो मैने आपको ओटीपी भेजा है.. वह ओटीपी मुडे बतो दो असे तिने सांगितले.तिवारी यांनी मोबाईलवर आलेला ओटीपी त्या महिलेला सांगितला. त्यानंतर काही वेळातच तिवारी यांच्या दोन्ही कार्डमधून सुमारे ६३ हजार रुपये कपात झाल्याचा त्यांना मॅसेज आला.
क्रेडीट कार्डमधून पैसे कपात झाल्यानंतर कस्टमर केअरमधील त्या महिलेचा तिवारी यांना कॉल आला. यावेळी ती तिवारी यांना म्हणाली की, तुमच्या क्रेडीट कार्डचा फ्रॉड झाला असून ते कार्ड मी बंद केले आहे असे म्हणून त्या महिलेने कॉल कट केला.
तिवारी यांना फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी तात्काळ बँकेच्या कस्टमर केअरकडे तक्रार दाखल केली. शनिवारी एमआयडीसी पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला