जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी शेख चांद शेख हमीद (रा. दिनदयाल नगर भुसावळ) यास गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे.
जगदीशसिंह छाबडा यांचे गुरुनानक इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. शेख चांद याने गुरुनानक दुकानमालक छाबडा यांचा विश्वास संपादन करुन एसी व फ्रिज या वस्तूंच्या खरेदीत 53 हजार रुपयांची फसवणूक केली होती. या फसवणूकीप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास आरोपी शेख चांद शेख हमीद यास बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने खडका चौफुली परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे. पो.नि. दिलीप भागवत व पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या निर्देशाखाली स.पो.नि. कृष्णा भोये, पो.ना.रविंद्र बि-हाडे, रमन सुरळकर, उमाकांत पाटील पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश माळी, परेश बि-हाडे, जिवन कापडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास स.पो.नि. कृष्णा भोये व रविद्र तायडे करत आहेत.