अखेर राष्ट्रवादीचे अभिषेक पाटलांची जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील यांना, मी वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविते. तुम्हाला हवे काय असे विचारून अभिषेक पाटील यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी अभिषेक पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यावरून महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अभिषेक पाटील यांनी सोमवारी 19 रोजी रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. त्यानुसार आज जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून रात्री 8 वाजेच्या सुमारास दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत अभिषेक पाटील यांनी म्हटले आहे की, शाकंभरी सुर्वे नामक महिलेला 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास माझ्या रीग रोडवरील कार्यालयात मनोज वाणी व इतर अज्ञात लोकांनी राजकीय जीवन संपवून टाकण्याच्या उद्देशाने बदनामीचे कटकारस्थान करून पाठविले होते. कार्यालयात प्रशांत राजपूत हा कार्यकर्ता उपस्थित होता. यावेळी शाकंभरी सुर्वेने, मी वेश्याव्यवसाय करते. तुम्हाला मुली हवे आहे का असे विचारून फिर्यादी अभिषेक पाटील यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्यावरून अभिषेक पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून जिल्हापेठ पोलिस स्थानकात कलम 417,120 (ब), 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय महेंद्र वाघमारे करीत आहेत.







