जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका तरुण बेरोजगाराची पार्ट टाइम नोकरीचे आमीष दाखवून १ लाख ३५ हजार रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर वावरत असताना कुठल्याही अनोळखी लिंकला तसेच स्कीमला प्रतिसाद देऊ नका. फसवणूक होण्याची शक्यता असते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
भूषण अजित चौधरी (वय ४१, रा. राधाकिसन वाडी, जळगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांना १४ एप्रिल ते ८ जूनच्या दरम्यान पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून एका अज्ञात मोबाईल धारकाने त्यांना मेसेज केला. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना एक वेब लिंक पाठवली. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीच्या दोन बँकेच्या खात्यांमधून चलाखीने १ लाख ३५ हजार ४५६ रुपये काढून घेतले.
त्यानुसार आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी भूषण चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि मीरा देशमुख करीत आहेत.