जळगाव ( प्रतिनिधी ) – टिव्ही, फ्रीज आदीं इलेक्ट्रॉनिक वस्तू होलसेल दरात स्वस्तात देण्याच्या नावाखाली शहरातील तरूणाची १४ लाख रूपयाची फसवणूक करण्यात आली . आरोपीच्या विरोधात सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख मोहंमद वासीम मोहंमद हारून ( वय ३९, रा. इकबॉल कॉलनी, जळगाव) याचे मेहरूणमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरूस्तीचे दुकान आहे. गेल्या वर्षी त्याने फेसबुकवर एसी टेक्नीशीयन ग्रुप जॉईन केला होता. या ग्रुपचा ऍडमीन सैयद वासीम अब्दुल याच्याशी त्याने संपर्क साधला. यातून झालेल्या ओळखीतून सैयद वासीम अब्दुल याने आपल्याकडे अत्यंत स्वस्त किंमतीत इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मिळत असल्याचे सांगितले. त्याने वस्तूंचा कॅटलॉग देखील पाठविला.
सैयद वसीम अब्दुल शेख मोहंमद वासीम मोहंमद हारून याने १०० एसी, १०० टिव्ही आणि १०० फ्रिज यांची ऑर्डर दिली. यासाठी १४ लाख ३९ हजार ४५८ रूपये समोरच्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये जमा केले. मात्र बरेच दिवसहोऊन देखील त्याला वस्तू मिळाल्या नाहीत. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याचे सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला पुढील तपास पो नि लिलाधर कानडे हे करीत आहेत.