जळगाव शहरातील गणेश काँलणीतील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला एटीएम सेंटरवर बोलण्यात गुंगवून त्याचे एटीएम कार्ड बदलून दुसरेच कार्ड हाती देत नंतर त्याच्या खात्यातून २० हजार रुपये हडपल्याची घटना काल गणेश कॉलोनीत घडली
शिव कॉलनी भागात राहणारे टी.आर.महाजन (वय ७०) हे रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. काल सायंकाळी ५ वाजता ते खात्यावर किती रकम शिल्लक आहे ते पाहण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गणेश काँलणीतील एटीएम सेंटरवर गेले होते . त्यावेळी तेथे आधीपासूनच ४ -५ जण थांबलेले होते. टी. आर. महाजन यांनी बराचवेळ खात्यावरील शिल्लक तपासण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांना शिल्लक समजू शकली नाही . तेवढ्यावेळेत तेथे असलेल्या अनोळखी लोकांना त्यांच्या एटीएम कार्डाचा कोड नंबर माहिती होऊन गेला. त्यापैकी एकाने प्रयत्न करून पाहतो असे सांगत त्यांच्या हातातून एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर त्यांच्या एटीएम कार्डासारखेच दिसणारे दुसरे कार्ड त्यांच्या हाती सोपवले आणि खात्यावरील शिल्लक मलाही समजत नसल्याचे सांगितले .
टी.आर.महाजन घरी परत आल्यावर सायंकाळी ५ वाजून १० ते १३ मिनिटांच्या कालावधीत त्यांच्या खात्यावरून या भामट्यांनी आधी ९ हजार ५०० , पुन्हा ९ हजार ५०० व तिसऱ्यांदा १ हजार असे २० हजार रुपये काढून घेतले हा प्रकार त्यानंतर घरी आलेल्या आपल्या मुलाला महाजन यांनी सांगितल्यावर त्यांचा मुलगा भूपेंद्र महाजन यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन वडिलांचे एटीएम कार्ड ब्लॉक केले त्यामुळे त्यांच्या खात्यावर शिल्लक असलेली बाकीची रक्कम वाचली . आज सकाळी टी. आर. महाजन हे जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांच्या विरोधात पो नि रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स .पो.नि.वाघमारे गुन्हा दाखल करीत आहे .