• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वकील कुटुंबाला दामदुप्पट आमिष; बिल्डर्स कंपनीकडून तब्बल १२ कोटी २० लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

वकील कुटुंबाला दामदुप्पट आमिष; बिल्डर्स कंपनीकडून तब्बल १२ कोटी २० लाखांची फसवणूक

जळगाव प्रतिनिधी धरमपेठ, नागपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जुगलकिशोर टिकमचंद गिल्डा (वय ६५) आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल १२ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २८ महिन्यात दाम दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रामदेवबाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीच्या सहा संचालकांनी २००६ ते २०२१ या कालावधीत गुंतवणूक करून घेतली. मात्र परतावा न मिळाल्याने तक्रारदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावताच २८ नोव्हेंबर रोजी जिल्हा पेठ पोलिसांनी सहा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ओळखीतून सुरू झालेली गुंतवणूक

तक्रारदार गिल्डा यांची नातेवाईकांमार्फत कंपनीच्या संचालकांशी ओळख झाली. संचालक शारदादेवी चांडक यांनी ‘२८ महिन्यात दुप्पट रक्कम’ मिळेल असे आश्वासन देत गुंतवणुकीस प्रवृत्त केले. कंपनी विविध शहरांत टाउनशिप, प्लॉट व फ्लॅट प्रकल्प राबवते, मोठा नफा देत असल्याचे सांगण्यात आले. त्या आमिषाला भुलून गिल्डा कुटुंबियांसह नातेवाईकांनी मोठी गुंतवणूक केली.

सुरुवातीला वाढ दाखवली; पुन्हा गुंतवणुकीस भाग पाडले

२००९ मध्ये दिलेली ८० लाखांची गुंतवणूक २०११ मध्ये १ कोटी ६० लाख झाली असल्याचे कळताच, तक्रारदारांनी ती रक्कम काढण्याऐवजी पुन्हा २८ महिन्यांसाठी गुंतविली. कंपनीने त्यासाठी लेखी आश्वासने व धनादेश दिले.

दाम न देता वादग्रस्त जमिनी दाखविल्या

रक्कम देणे टाळत कंपनीने त्यांना मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जमीन दाखविली. मात्र त्या जमिनी वादग्रस्त असल्याचे उघड झाले. अखेर जळगावातील मुक्ताईनगर शिवारातील जागा दाखविली; पण नगररचनाकारांकडून ती जागा रहिवासी विकासासाठी अनुपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले.

स्वतःची मालमत्ता विकूनही पैसे गुंतवले

गुंतवणुकीबरोबरच गिल्डा यांनी स्वतःची मालमत्ता विकून मिळालेले ५० लाख रुपयेही कंपनीला दिले. २०१३ मध्ये त्यांनी संपूर्ण रक्कम मागितली असता टाळाटाळ सुरू झाली. अखेर १७ लाख ५० हजारांचा एकच धनादेश देण्यात आला.

शेवटी न्यायालयीन आदेशानंतर गुन्हा दाखल

परतावा न मिळाल्याने अॅड. गिल्डा यांनी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी कंपनीचे संचालक  गोपाल हरिकिसन चांडक (४२), मोहन हरिकिसन चांडक (३८), शारदादेवी हरिकिसन चांडक (६०), गणेश विठ्ठलदास चांडक (५८), शिल्पा गोपाल चांडक आणि सुजाता मोहन चांडक (सर्व रा. आर्वी, जि. वर्धा)
यांच्यावर गुन्हा दाखल केला.हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक आशीष लवंगळे करीत आहेत.

 


 

 

Tags: #jalgaonfraud
Previous Post

“जनतेचा विश्वास, जनतेचे हित आणि जनतेचा विकास”-आ. अमोल पाटील

Next Post

विकासाकरिता भाजपच्या उमेदवारांना विजयी करा -इद्रीसभाई मूलतानी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विकासाकरिता भाजपच्या उमेदवारांना विजयी करा -इद्रीसभाई मूलतानी

विकासाकरिता भाजपच्या उमेदवारांना विजयी करा -इद्रीसभाई मूलतानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon