सायबर पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील एका प्रौढाला विमा पॉलिसीचे आमिष दाखवून २२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलीस स्टेशनने एका तरुणाला दिल्ली येथून अटक करून आणली आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
रावेर येथील फिर्यादी संजय कुलकर्णी (वय ५९) यांना अज्ञात आरोपींची विमा पॉलिसीचे आमिष दाखवून २२ लाखांत फसवणूक करण्यात आली होती. तर याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला फेब्रुवारी २०२४ ला गुन्हा दाखल होता. (केसीएन)याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनने तपास करून संशयित आरोपी राहुल पाल सुखबीर सिंग (वय ३७, रा. अशोक नगर, दिल्ली) याला दिल्ली येथे जाऊन अटक केली आहे.
त्याच्याकडून अद्याप मुद्देमाल मिळून आलेला नाही. संशयित राहुल पाल याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायमूर्ती डी.ए. सरनायक यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.(केसीएन)सदरची कारवाई हि पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे, प्रदीप चौधरी, उज्वला माळी यांनी केली आहे.