जळगाव ( प्रतिनिधी ) – फोन पेवर रिवॉर्ड पाठवल्याचे सांगत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील अधिकारी महिलेच्या बँक खात्यातून ५४ हजार ऑनलाईन हडपले असल्याचे उघडकीस आले आहे.
फसवणूक झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यलाय रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी स्वाती इंगळे ( वय ३० , रा सेंट्रल बँक कॉलनी , पिंप्राळा रोड , जळगाव ) यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की , त्यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे त्या खात्याला फोन पे अँप अटॅच आहे . १२ नोव्हेंबर रोजी त्यांना ८६३७५९३४८९ या क्रमांकावरून कॉल आला होता. कॉलवर बोलणाऱ्याने विश्वास संपादन करून त्यांना सांगितले की, फोन पेवर रिवॉर्ड पाठवले आहे. फोन चालू ठेऊन तपासून घ्या. त्यांना त्यांनतर आलेल्या लिंकवर त्या प्रोसेस करीत असतानाच त्याच्या या बँक खात्यातून ५४ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन काढून घेतले होते. पुन्हा त्या व्यक्तीला स्वाती इंगळे यांनी कॉल केल्यावर त्यांना थोडा वेळ वाट पाहायला सांगण्यात आले होते. मात्र नंतर काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.