जळगाव – जळगाव शहरातील एका लोकप्रतिनिधींच्या वाईन शॉप्सच्या साठ्याची तपासणी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी केली होती . मात्र या वाईन शॉप्सचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्तता यांनी केला आहे. 2 मे रोजी छापे मारले असताना अद्याप पर्यत कार्यवाही अहवाल गुलदस्त्यात असून राज्य उत्पादन शुल्क विभागाची मिलीभगत असल्याचा आरोप दीपक कुमार गुप्ता यांनी केला आहे.
या संदर्भात निःपक्षपाती कार्यवाही व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,मुख्यसचिव महाराष्ट्र, लेखी पत्रा द्वारे तक्रार दिली आहे. तर कांतीलाल उमप राज्य उत्पादन शुल्क आयुक्त महाराष्ट्र , श्री होले- उपायुक्त यांच्याशी दूरध्वनी वर संपर्क साधत इमेल द्वारे तक्रार केली आहे.