जळगाव ( प्रतिनिधी ) ;-कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातल्या रुग्ण व नागरिकांच्या सेवेसाठी भाजपतर्फे ‘कोरोना-आपदा सेवा कार्य समिती’ची स्थापना करण्यात आली असून शहरातील ९ मंडळांमध्ये विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आ. गिरीश महाजन, खा . उन्मेश पाटिल, आ. सुरेश (राजूमामा) भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात मंडळ-४ चे अध्यक्ष केदार देशपांडे ,जिल्हा संयोजक डॉ. राधेश्याम चौधरी (महानगर सरचिटणीस) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या १ ते ९ या मंडलात ‘कोरोना-आपदा सेवा कार्य समितीची’ स्थापन करून यात खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा संयोजक डॉ राधेश्याम चौधरी संपर्क क्रमांक:- 94227 71474 ,मंडल क्र:- ४ (रिंगरोड परिसर), मंडल संयोजक धीरज वर्मा ( 9850722779), लसीकरण प्रमुख अतुलसिंह हाडा (9890190290), कोविड सेंटर प्रमुख महेश चौधरी(8177887777), प्लाझ्मा/रक्तदान प्रमुख सचिन बाविस्कर (9822726214) , समुपदेशन प्रमुख सौ.दिपमाला काळे (8806541774), रुग्णवाहिका प्रमुख चेतन तिवारी (9168683832)