६१ व्या वाढदिवसानिमीत्त डॉक्टरांसह मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
जळगाव – डॉ. उल्हास पाटील यांचे कार्य एका दिपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांचे अपार कष्ट हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे या उक्तीप्रमाणे डॉ. उल्हास पाटील हेच खरे पालनकर्ता असल्याच्या शुभेच्छारूपी भावना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टरांसह मान्यवरांनी व्यक्त केल्या.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचा ६१ वा वाढदिवस हा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयातील किवा तेवन येथे दिवसभर डॉ. उल्हास पाटील यांनी शुभेच्छांचा स्विकार केला. यावेळी आई श्रीमती गोदावरी पाटील, गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, नात किवा पाटील, अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, माया आर्विकर, डॉ. चंद्रय्या कांते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. शासकीय नियमांचे पालन करून छोटेखानी स्वरूपात झालेल्या कार्यक्रमात डॉ. उल्हास पाटील यांनी शुभेच्छांचा स्विकार केला. यावेळी डीन डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. चंद्रय्या कांते, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. मिलींद जोशी, डॉ. शिवाजी सादुलवाड, डॉ. नेहा महाजन, डॉ. ऋतुराज काकड, अशोक भिडे, डॉ. तळेले, प्रा. विठ्ठल शिंदे, डॉ. महेश चौधरी, प्रा. बिटे, डॉ. प्रदीप देवकाते, डॉ. कैलास वाघ यांच्यासह मान्यवरांनी डॉ. उल्हास पाटील यांच्याप्रती शुभेच्छारूपी भावना व्यक्त केल्या.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ, सावदा आणि जळगाव तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय तसेच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय, कृषी महाविद्यालय आदि ठिकाणी डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.
खासदार म्हणून जिल्ह्याची सेवा घडो – योगेंद्रसिंग पाटील
खा. राहुल गांधी यांच्या टिम मधील विश्वासू सहकारी काँग्रेसचे योगेंद्रसिंग पाटील यांच्यासह समर्थकांनी आज किवा तेवन येथे येऊन डॉ. उल्हास पाटील यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोगत व्यक्त करतांना योगेंद्रसिंग पाटील यांनी सांगितले की, अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सोय डॉ. उल्हास पाटील यांनी उपलब्ध करून दिली. सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत ते खासदार म्हणून निवडून येऊन त्यांच्या हातून जिल्ह्याची पर्यायाने देशाची सेवा घडो अशा शुभेच्छा योगेंद्रसिंग पाटील यांनी दिल्या.
डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन
वाढदिवसाचे औचित्य साधत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. महेश चौधरी यांच्या आयुर्वेद विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन माजी खा. डॉ. उल्हास पाटील, श्रीमती गोदावरी पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. एन.एस. आर्विकर यांच्या हस्ते करण्यात आले.
नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे भुमिपूजन
भविष्यातील वाढीव जागांचे नियोजनाच्या दृष्टीने आज डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे भुमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी माजी खा. डॉ उल्हास पाटील यांचेसोबत सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ वैभव पाटील, गोदावरी नर्सिंगचे प्राचार्य डॉ. रविंद्र पुराणिक, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड आदी उपस्थीत होते. कोविडच्या पार्श्वभुमीवर आगामी काळात कोणतीही आपत्ती आल्यास प्रशासन सज्ज राहण्याच्या तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे विविध अभ्यासक्रम भविष्यात सूरू करायचे आहे यात गोदावरी नर्सिंग स्कुल, उभारणीच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.








