कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर : सततची नापिकी आणि खासगी बँकेचे कर्जास कंटाळून बोदवड येथील शेतकऱ्याने विषारी द्रव्य सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली. मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड येथील विलास गुलाबराव पाटील या ४५वर्षीय शेतकऱ्याने १५फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ च्या सुमारास राहत्या घरात विषारी द्रव्य सेवन केले. त्यास मुक्ताईनगर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचे उपचार सुरू असतानाच मध्यरात्री साडे बारा वाजता त्याची प्राणज्योत मालवली. मयत शेतकऱ्यावर खासगी बँक व उसनवारी चे कर्ज असल्याचे समजते. सततची नापिकी मुळे मयत शेतकरी त्रस्त होता त्यातच खासगी कर्जाने बेजार झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. तोच घरातील कमावता होता. त्याच्या अकाली जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.








