चाळीसगाव (प्रतिनिधी ) ;- जिजाऊ जयंती उत्सव समिती ,चाळीसगाव ,जि.जळगाव च्या वतीने गेल्या 3 वर्षापासून माँसाहेब जिजाऊ जयंती उत्सव साजरा केला जातोय. पण या वर्षी कार्यक्रमास होणारी गर्दी पाहता व त्या अनुषंगाने कोव्हिड 19 च्या आजारास कुठले ही कारण न होता समाजभान ठेवत, 12 जानेवारी 2021 ला साजरी केला जाणारा जिजाऊ ,सावित्री, रमाई जन्मोत्सव सोहळा या वर्षी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून छोटेखानी स्वरूपात साजरा केला गेला.

यावेळी -सोनाली ताई साळुंखे (अध्यक्षा:-जिजाऊ जन्मोत्सव समिती चाळीसगांव),सविता ताई कुमावत (शिवसेना महिला आघाडी उप तालुका प्रमुख, चाळीसगांव तसेच भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नई दिल्ली जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष),सविता ताई राजपूत (नगरसेविका),सुचित्राताई पाटील (अध्यक्षा:-हिरकणी महिला मंडळ),शैलाताई पवार ,सुवर्णाताई राजपूत (अध्यक्षा:-करणी सेना) व इतर महिला उपस्थित होत्या .







