मुक्ताईनगर ;- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, रवींद्र महाराज हरणे, विनायकराव पाटील, उध्दव महाराज जुनारे, विलास संत यांनी पंढरपूर येथे चैतन्य महाराज देगलुरकर यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. यावर्षीचा कार्यक्रम रद्द करून पुढील वर्षांत २०२२ मध्ये सप्ताह महोत्सव करण्याचे ठरले आहे. संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातच हा भव्यदिव्य कार्यक्रम साजरा होणार असल्याने भाविकांना वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.








